बाप्पा रे...!

Started by शिवाजी सांगळे, September 15, 2016, 09:12:45 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बाप्पा रे...!

रीते झाले मखर आता
समई सुध्दा मंदावली,
आठवण तुझी गणराया
मनात कशी रे दाटली !

अकरा दिवस सोबतीचे
कसे रे त्वरा निघोन गेले,
आरती, नैवेद्य, प्रसाद तो
करण्यात दिवस ते सरले !

प्रतिक्षा तुझी गणनायका
दाटेल नेत्री वर्षभर आता,
आळस उडेल तो मनाचा
भास त्वा आगमनाचा होता!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९