भक्ती कविता

Started by Prabhakar bhasme, September 17, 2016, 01:18:57 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

काय सांगु मी तुझ माझ नात
जवळी घेतले पंढरीनाथ
नामा म्हणे घास घेरे देवा
तूच माझा सखा पंढरीनाथ

देवा राहीन मी उपाशी
नैवेद्याचे ताट तुझ्यासाठी
जेवा लवकरी पंढरीनाथ
सखा माझा पंढरीनाथ

दामुशेटी बोट घाली तोंडात
देव जेवला आनंदात
सखा झाला माझा पंढरीनाथ
काय सांगू  मी तुझ माझ नात....

प्रभाकर भस्मे
9757135696