काय केला मी गुन्हा

Started by Ketan Kurhade, September 19, 2016, 03:57:49 PM

Previous topic - Next topic

Ketan Kurhade

काय केला मी गुन्हा,
का हिच शिक्षा मला पुन्हा पुन्हा,

प्रेम केलय ग फक्त तुझ्यावर कोणत पापं नाही,
किती सहन करतोय आज ह्याचं माझ मला माप नाही,

आठवणीत तुझ्या आज ही मी खुप  रडतो,
खरच आवडत नसेल का मी तुला ह्या प्रश्नात मी पडतो,

जिव ओवाळून टाकलाय ग मी तुझ्यावर,
खरच नाही प्रेम करतं का ग तु माझ्यावर,

बरेच प्रश्न आहेत  मनात माझ्या ते कवितेतून मी मांडतो,
विरहात तुझ्या ह्याचं शब्दां सोबत मी भांडतो,

दुर आहेस तु माझ्या पासुन तरी ही तुला विसरता मला येत नाही,
किती ञास सहन करतोय मी तुला माझी दया कशी येत नाही,

कठोर झालीये तु का विसरलीस मला,
नाही कळणार का कधी माझ्या ह्या प्रेमाची किंमत तुला,

भेट तुझी माझी पुन्हा कधीचं झाली नाही,इतक प्रेम करुन सुद्धा हाती माझ्या काहीच लागल नाही.....

siddheshwar vilas patankar

प्रत्येकाच्या  मनातले भाव तुम्ही तुमच्या कवितेतून  सुंदर मांडले आहेत . हि कविता म्हणजे हळुवार खुलणाऱ्या नात्याची शोकांतिका आहे . आजच्या युगातील जोडप्याची अन त्याच्या  मधील दुराव्यांची एकांकिका आहे . जबाबदाऱ्या वाढल्या कि तुमची कविता वाचून भांडण सोडविता येईल . एकूण रचना च्छान झाली आहे .

सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C