Motivational kavita

Started by Prabhakar bhasme, September 24, 2016, 03:17:21 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

 " शांताबाई "

शांताबाई , शांताबाई, धैर्याची बाई
कर्तुत्वाची, सहनशीलतेची, मानाची बाई
राणी लक्ष्मीची जिद्द , करीन ती पूर्ण, लढणारी बाई
मराठवाड्याची शान ती, मानाची बाई

ऐनवेळी कुंकू पुसलं, निराधार राहीली एकटी
संसार उधळून गेला, नाही कोणी तिला वाली
शेती गेली, ओठावरचा घास गेला पण जिद्द तिची मोठी
संसाराला तोंड देण्याचा निर्धार तिचा पक्का

बाई असून घेतला वस्तरा हाती
लोकांची दाढी करून, पैसा जमविला हाती
नाही डगमगली, कारण निश्चय होता पक्का
शांताबाई धैर्याची बाई, कर्तुत्वाची बाई

कळ्या उमलल्या, घातली फुलांची रांगोळी
गावक-यानी ठरविले करू लग्नाची घाई
शांताबाई मनाची पक्की, केली मुलींची लग्नघाई
शांताबाई, धैर्याची बाई, कर्तुत्वाची बाई...

( स्वरचित )
प्रभाकर भस्मे
९७५७१३५६९६