'MOBILE'- एक हरवलेलं बालपण.

Started by Mayur Mundada, September 24, 2016, 07:03:56 PM

Previous topic - Next topic

Mayur Mundada

'MOBILE'- एक हरवलेलं बालपण.

द्रुश्य पाहुनी या आधुनिक जगातील
काश जन्मताच गर्भातून घेऊन आलो असतो 'मोबाईल',

बालपणीच्या गोष्टी आज डोक्यात रमल्याच नसत्या
स्वताचच विश्व निर्माण झाल असत घरी बसल्या बसल्या,

'मामाची पत्र' पाठी मागे धावता धावता हारावलीच नसती
'Candy Crush' च्या आधारे बालपणाची गाडी हळुच चालली असती,

आजीच्या गोष्टी ऐकून नसते झाले कल्पनांचे विचार मंथन
आई-बाबाच्या 'मोबाईल' मध्ये 'फोटो' घेऊन आज भरले असते मन,

कबड्डी, खोखो, खेळून मातीत रामलोच नसतो
घरी बसून आरामशीर डिजिटल दुनिया बघत असतो,

इकडे तिकडे विचारत-विचारत नसते केले शाळेचे गृहपाठ
हातात धरून 'मोबाईल' लगेच पकडली असती 'Google दादा' ची वाट,

डोळ्याने  हे निसर्ग रम्य देखावे कधीच अनुभवलेच नसते
दिवस रात्रं 'मोबाईलच' एक अमानवीय मित्र बनले असते,

'येरे येरे पावसा' सारखे म्ह्टलेच नसते 'बाल-गीत'
लहानपणा पासूनच ऐकले असते 'हिंदी' आणि 'विदेशी' संगीत,

लहान असतांना मुळीच रडलो नसतो कधी
थोड ही त्रास दिल्यावर 'मोबाईल' असत हाती,

पण बर झाल देवा माझ्या हातात 'मोबाईल' नव्हता
नाहीतर हरवल असत बालपण चालता बोलता....

                                          ©Mayur Murlidhar Mundada
                                           M.No. 9404544475.
MMM