साऱ्याच रावणांना

Started by विक्रांत, September 24, 2016, 08:48:24 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

 
साऱ्याच रावणांना का
येई पुळका नीतीचा
समजून अग्नी होई   
का परीक्षक सीतेचा 

ते स्पेशल टक्केवाले
घरदार भरलेले
चेकाळल्या कौरवांच्या
हाटात रोज विकले

तू सदैव चूप होती
भिडस्तच मुलुखाची
घरदार विसरुनी
कर्तव्य सुख साची

बघ रोज जाती राव
कमवून इथे काही
मालात शेलका वाटा
मरो काम बाकी तेही

कळणार तुज नाही 
खाती तया हिशोबाची
धन मल्लिका कालची
यश घोर पावुलाची

मुखी तोफखाना तैसा
तुज पेलणार नाही
तू मानिले जया ढाल 
तो ही टिकणार नाही

हे गाव नसेच तुझे
शेजार ही आटलेले
जा सुखानी कुठे तू
घर कीर्ती साठवले 

मनसुबे थोर जरी
उकिरडे साचलेले
तव गंध वाटिकेचे
कौतुक कुणा कसले

हे वाहतेच गटार
किती साल गेले जरी
दुर्गंधीच साचलेली
रहा लांब आता तरी

जाईल मळभ सारे
पुन्हा उनही पडेल   
ठेव साक्षीला प्रकाश
मग पाउले ती उचल 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/