शृंगार आसवांचा

Started by शिवाजी सांगळे, September 27, 2016, 08:01:12 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शृंगार आसवांचा

डोळ्यात ओल्या आसवांचा
शृंगार पाहिला मी
ओठातच दाबल्या वेदनेचा
हुंदका ऐकला मी

मरता रोज तो जीव एक
श्वासात जो गुंतलेला
एकांती निश्वास घेत
पहुडलेला पाहीला मी

उसवल्या ओठाच्या किनारी
लेप लाळेचा दाटलेला
घाव जिरलेल्या जखमेचा
शरीरावर पाहिला मी

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९