बाबा म्हणजे, बाबा म्हणजे

Started by सनिल पांगे....sanilpange, October 03, 2016, 05:24:45 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

तसं आईवर खुप कविता केल्या गेल्या...... बाबांच्या वाटेला मात्र ते सुख मोजकच आलेलं....... आज माझ्या बाबांना आठवून जे मी लहान असतानाच आम्हाला सोडून देवाघरी गेले, एक कविता केली.... तुम्हाला निच्छित आवडेलं '[/font]
बाबा म्हणजे, बाबा म्हणजे
फक्त बाबा असतो
जिथे कुठे आयुष्य चुकतं
तिथे तो ताबा घेतो
[/font]
बाबा म्हणजे, बाबा म्हणजे
आई इतकाच महान जणू
आई सुवासणारं चंदन,
बाबा साथ देणारी साण जणू
बाबा म्हणजे, बाबा म्हणजे
एक विशाल आभाळ
आई थोपटणारी रात्र
बाबा उठवणारी सकाळ
बाबा म्हणजे, बाबा म्हणजे
एक खंबीर आधार खरा
वरवर काटेरी जरी,
आतून रसाळ फणसाचा गरा
बाबा म्हणजे, बाबा म्हणजे
दगड हृदयी मानव भासे
दगडावर विश्वास ठेवता
तो हाडामासाचा देव दिसे
@ सनिल पांगे