कविता II बघितली का कधी बायकोमध्ये , मेनका अन रंभा II

Started by siddheshwar vilas patankar, October 04, 2016, 04:23:07 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

बघितली का कधी बायकोमध्ये

मेनका अन रंभा

जर उत्तर हो असेल

तर तुम्ही गब्बर अन मी सांबा

असं तर नाही ना

कि तुम्ही बोलायचं म्हणून बोलता

आजूबाजूला कुणी नाही हे पाहून

तिला मनातल्या मनात शिव्या घालता

अस्सं असेल तर चालेल मला

चालेल काय आवडेल मला

समजेन कि मी एकटा नाही या जगी

इथे प्रत्येक जण आहे माझ्यासारखाच दुखी

राव , गेला तो  जमाना

जिथे मान होता आपल्याला

आता मान धरून गरागरा फिरवते

कायदा पण आहे कि तिच्यासंगे

आपली दणादणा वाजवायला

आत्ता तर त्यांना सरकार दरबारी मान पण मिळतो

आपण कितीही केलं तरी

आपल्याला कोण विचारतो

डोळे वटारले तरी केस लढवतात

वकील हाताशी धरून अर्धी कमाई हादडतात

खरं खोटं करण्यात आपलं जातं आयुष्य

तूच ठरवं गड्या आता कसं उचलायचं धनुष्य


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C