कविता II तो एकच शब्द नको होता , जो तू मला दान दिला II

Started by siddheshwar vilas patankar, October 06, 2016, 02:59:28 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

तो एकच शब्द नको होता

जो तू मला दान दिला

अशी का वागली तू माझ्याशी

का तुझ्या घरच्यांनी इतका मान दिला

पुष्कळ केलंत  अहो जाहो

पुरे झाली ती उठबस केलेली

नाटकांनी पुरता हैराण झालो

पोहोचलाच नाही मी फोडलेला टाहो

ते इशारे कुणास होते

का उजळणी होती

दुसऱ्यासाठी केलेली

प्रत्येक शब्द कानात गोठले

मन नवी स्वप्नं पाहत होते

निदान स्वप्नं तरी उधार द्यायची 

तेवढे पण पुरे होते उर्वरित हयातीस

असा दुर्दैवी जन्म पुन्हा नाही

कोण जाणे काय पाहिजे नियतीस

नकळत लागली होती सवय मजला

तुझ्या नखरेल इशाऱ्याची

जेव्हा बंद झाले सारे

तालमीत पुरता गेलो भरडला

रस्ता तोच होता

माणसे पण तीच होती

दुनिया वेगळी झाली

कि मी झालो वेगळा ?


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C