कविता II आत्ताच धरली होती खपली , पुन्हा नव्याने जखम झाली II

Started by siddheshwar vilas patankar, October 06, 2016, 04:36:32 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

आत्ताच धरली होती खपली

बाजारात बघता तुला

पुन्हा नव्याने जखम झाली

गेली खपली गेली , त्या जागी परत जखम आली 

सामानाची पिशवी आठवणींनी जड झाली II

कांदे बटाटे नकोसे झाले

भाज्यांचे रंग आवडेनासे झाले

दाखवून त्या हिरव्या रंगांसी पाठ 

लाल निशाण फडकावले II

फेकून दिली पिशवी

भर रस्त्यावर बाजारात

अस्साच परतलो माघारी

हात हलवून घरात  II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C