माझ्या निवडक चारोळ्या - सनिल पांगे

Started by सनिल पांगे....sanilpange, October 07, 2016, 12:04:04 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

आई.....तुझी येता गोड आठवण
त्या कवितांना जन्म देऊ लागतात
कागद हलके हलके हेलकावतात
शब्दही मग श्वास घेऊ लागतात
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

जन्म माझा सार्थ झाला
म्हणायलाही घाबरत होतो
भावना रहीत जगात मी
भावनां सहीत वावरत होतो
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

स्वप्नांचं घर म्हणटलं की
काचेचा उल्लेख येणार
नि काचेचा विषय निघाला
तर तुटून वेदना देणार
@ सनिल पांगे


सनिल पांगे....sanilpange

विणलं मन मनाशी तर,
नात्याचं जाळं पसरणारचं
जिथे प्रेमाचा उतार असेल
तिथे भावना ह्या घसरणारचं
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

अशीच एक संध्याकाळ हवी
तुझ्या सहवासात दंगलेली
तिला हवा एक रात्रीचा दुवा
स्वप्नांच्या रंगात रंगलेली
@सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

तुझा सहवास असला की
आभाळही मुठीत येतं
नकळत मग आभाळा येवढं सुख
तुझ्या रुपानं मिठीत येतं
@सनिल पांगे


सनिल पांगे....sanilpange

कधीतरी कळून चुकेल
प्रेमाला पर्याय नाही
तू तुझी आहेस मान्य,
पण तू माझ्याशिवाय नाही [/size]
@ सनिल पांगे[/size]

सनिल पांगे....sanilpange

काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये
@सनिल  पांगे

सनिल पांगे....sanilpange

नशीबाच्या बात नको करूस
चार चौघात बसल्यावर
तुला नशीब कशाला हवयं
तू स्वत:च दुसऱ्याचं असल्यावर
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

गेली असतील माझ्या पासून
दूर काही माणसे
माझ्या जवळ येण्यासाठी
आतूर काही माणसे
@ सनिल पांगे