माझ्या निवडक चारोळ्या - सनिल पांगे

Started by सनिल पांगे....sanilpange, October 07, 2016, 12:04:04 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

तुझ्या आठवणीत हरवल्यावर
कोणीच मला चाचपडतं नाही,
दु:ख निघते माझ्या शोधात
पण मी त्याला सापडत नाही
@ सनिल पांगे



सनिल पांगे....sanilpange

तुझी निर्मीती म्हणजे देवांना
एक गोंडस स्वप्न पडलेलं नि,
आपाअपसात वैर नको, म्हणून
पृथ्वीवर तुला धाडलेलं
@ सनिल पांगे


सनिल पांगे....sanilpange

नुसत्या तुझ्या नसण्याच्या विचारानं
स्तब्द झालो काही क्षण
कळून चुकलं, किती अन कुठवर
तुझ्यात गुंतलय मन
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

ती निघून जाताना
एक कोमजलेलं फुल देऊन गेली
माझ्या जिवनातला मात्र
बहरलेला वसंत घेऊन गेली
@सनिल पांगे




सनिल पांगे....sanilpange

हृदयाचे तुकडे झाले तरी
वचनाला भेग गेली नाही
माझ्या आयुष्यावर ओढली, पण
तुझ्यावर रेघ नेली नाही
@ सनिल पांगे




सनिल पांगे....sanilpange

#25
मी कधीच दोष लादत नाही
चुकणाऱ्या मुलांवर
काटे बोचले म्हणून का कुणी
रागवतं फुलांवर
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

हलक्या हातानं तुझी स्वप्न
मला जसं मिठ्ठीत घेतात
पंखविणा माझ्या मनाला
दूर क्षितिजा पलीकडे नेतात
@ सनिल पांगे







सनिल पांगे....sanilpange

#27
"विश्वास" ह्या शब्दा मध्येच
श्वासाचा उल्लेख ठळक आहे
नि "श्वास" म्हणटला की
जिवंत असल्याची ओळख आहे
@ सनिल पांगे



सनिल पांगे....sanilpange


तू गच्च मिठीत घेतोस
एक क्षणहि पुढे सरकत नाही
डोळे पापण्यांचे दार लावतात
ओट म्हणतात आता हरकत नाही
@ सनिल पांगे


सनिल पांगे....sanilpange

#29
फुगा तलवारीनंही फुटतो
आणि इवल्याश्या टाचनी सुद्धा
कुठे, कधी, काय वापरावं
बस इतकाच मुद्दा
@ सनिल पांगे