कविता II परतुनी मागे मी बघता , शल्य बोचते मनाला II

Started by siddheshwar vilas patankar, October 12, 2016, 07:41:41 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

परतुनी मागे मी बघता

शल्य बोचते मनाला

एक वेडा वाट चालला

एक वेडा वाहात चालला

वेळ दिसे काट्यावरी

कधी ना परतणारी

वाट पाहून अशीच कोमेजून गेली

त्या वाटेवर फुललेली फुले सारी

शिंकण्यात पण झाला गुलाम तू

नित्य धरी हाती रुमाल तू

आठवतेय का ती शाळकरी शिंक तुला ?

खळाळून बाहेर पडलेला शेमबुड पिवळा

ताप खोकला सर्दी पडसे

सर्वाची काढली होती पिसे

डॉक्टरने पण हात जोडले

येण्यासाठी  निमंत्रण धाडिले

ठेच लागता लावे माती

हसता हसता जोडे नाती

त्या नात्यांचे भान विसरला

जसा जसा तू कमावता झाला

धुंडाळ नव्या वाटा पुन्हा नव्याने

जुनी वाट केव्हाची हरवला 

ते दिवसं मनात घर करून गेलेत

घरातलं मन चोरून गेलेत

डोळे बंद करतो जेव्हा जेव्हा

त्या मनातल्या घरात खेळ असतो

त्याच लहान वाटेवर लोळत असतो


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C