शोध ...

Started by विनायक आनिखिडी, October 13, 2016, 05:14:03 AM

Previous topic - Next topic
शोध ... 

शोधण्या माणुसकीला, आज
माणूस चालला
प्रेम नाही , प्रीत नाही
ना कुठे ही भावना
आई च्या त्या यातनांचे
मोल ना पोरा स उरले   
आई च्या गर्भात तुटली
नाळ जणू वाटे असे
जोडण्या ती नाळ पुन्हा
आज मुलगा चालला
शोधण्या माणुसकीला, आज
माणूस चालला

बालपण चे खेळ आत्ता
चित्र बनुनी राहिले
हास्य नाही खुलून येते
एक smily बास झाली
मृतजनांचे,  पिर्त करुनी
संबंध होते राखले
जिवंतपणी देखील आत्ता
बाप वाटे भारले
जन्मदात्या च्या ऋणाना
शोधण्या मुल चालला
शोधण्या माणुसकीला, आज
माणूस चालला

एककाळी देत होते
अपुले समजून सारे
आज सगळे दाम पुसती
विकत ही मिळती निखारे
भावनेतील "भाव" उरला
अर्थ त्याचा "दाम" झाला
शोधण्याला भावनांचे दाम
की, तो चालला
शोधण्या माणुसकीला, आज
माणूस चालला

आज ना कोणी कुणाचे
राहिले आत्ता इथे
मानवाचा सांगडा ही
यंत्र बनुनी वावरे
भाव नाही भावना
विसरुन आश्रू ही गेले
हरवलेल्या या मनाला
शोधण्या तो चालला
शोधण्या माणुसकीला, आज
माणूस चालला