कविता II त्ये गलासात काय हाय? II

Started by siddheshwar vilas patankar, October 13, 2016, 04:55:54 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



त्ये गलासात काय हाय?

झिणझिण्या येतायत बघ

दिसतंय त्ये पाण्यावाणी

पिल्यावर चिमित्कार व्हतंया 

जो तो नाचतया गातया

बेफाम व्हतंया

मग जग का देतया, शिव्या न श्राप ?

हि तर अश्राप

बापाची बाप , माझी दारू

हिच्यासंगं जीव रमला

हिच्यांतच बुडाला

इसरलो दुःखाला

इसरलो जगाला

कोण मागं , कोण पुढं

हिशेब ना कळाला

लागलो  म्या लागलो

बघता बघता हिच्या गळाला

नातलग सारे बंद त्या बाटलीत

खोलतो मी बाटलीस  बैठकीत

एक एक करुनि रीती होते

उर आठवणींनीं भरून येते

रडू लागतो, येता नजरेस बाटलीत चिमुकली

वाट माझी चुकली,  गड्या हि वाट नाय आपली

दारु नाय चांगली , गड्या हिने वाट घराची लावली



सिद्धेश्वर विलास पाटणकर C

सिद्धेश्वर विलास पाटणकर C