आशिर्वाद

Started by Asu@16, October 15, 2016, 01:08:24 PM

Previous topic - Next topic

Asu@16

आशिर्वाद

फुलांसारखा हसत रहा
नाती सगळी जपत रहा
स्वत:आधी दुसऱ्यांसाठी
सदैव तू झटत रहा
कस्तुरीसारखा आयुष्यात
सर्वत्र तू दरवळत रहा
देव नको दैत्य नको
फक्त तू माणूस रहा
आयुष्याचा जमाखर्च
वाढदिवशी पडताळून पहा
झाल्या चुका विसरून तू
आयुष्य पुढे चालत रहा
हसणे तुमचे आमच्यासाठी
लाखमोलाच्या अनंत भेटी
आशिर्वाद आमचे तुमच्यापाठी
जन्मोजन्मी ना सुटतील गाठी


- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita