हुंदका

Started by गणेश म. तायडे, October 21, 2016, 10:18:23 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

जिव्हाळ्याचे होते नाते
मात्र आज ते सैल झाले
चुक कुणाची कळेना
आपलेच आज गैर झाले
पापण्यांत होते ठेवलेले
आज ते नजरेआड झाले
तुटत आहेत बंध सारे
गुंतलेले मन अधीर झाले
अश्रु होते पापण्यांत
हृदयात ती अजुन होती
श्वास होता दाटलेला
दुर जेव्हा ती जात होती
आस होती अजूनही पण
जीवास चैन माझ्या नाही
सुटलेल्या क्षणांना वेचताना
मनी हुंदका दाटून येई...

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11