कवितेच्या प्रतीक्षेत

Started by k.suhas, October 21, 2016, 10:51:53 AM

Previous topic - Next topic

k.suhas

आजकाल तिची माझी भेट
फारशी काही होत नाही
म्हणून कदाचित आता मला
नवीन कविता काही सुचत नाही

ती आणि तिचे हास्य होते
माझ्या कवितेची प्रेरणा
महिना तसाच निघून जातो
काव्याची काही होत नाही रचना

कधी काळी तिचे बोल
असायचे माझ्या कवितेचे शब्द
कागद लेखणी घेऊन आकाशाकडे
नुसता पाहत राहतो स्तब्द

पावसाच्या पहिल्या सरीसोबत
मन तिच्या आठवणीत हरवून जाते
माझ्या डायरीतले ते पान
कवितेच्या प्रतीक्षेत तसेच कोर राहते....... 
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com