सरी मागुन सरी येतात...

Started by Jayjeet, October 24, 2016, 09:00:01 PM

Previous topic - Next topic

Jayjeet

सरी मागून सरी येतात या श्रावणी
    दाटले असे हे दाट धुके रानोरानी,
हिरवा झाला निसर्ग सारा
    मीही झालो हिरवा, येऊनी तुझ्या आठवणी।

आहे जसा हा पाऊस पुणेरी
    ढगामागून दिसतसे ऊन सोनेरी
ऊन-पावसाचा खेळ चाले या क्षणी,
    का होतोय खेळ माझ्याही प्रेमाचा?
का दिसत नसे तुज, प्रेम माझीया नयनी?।

निघून गेला पाऊस हा सारा
    पडले कोवळे ऊन या ठिकाणी,
घेतली जागा ऊन्हाने त्या पावसाची
    देशील का जागा मज, तुझीया मनी।

सुटला आता गारगार हा वारा
    आकाशी गेले पक्षी सारे ऊडूनी,
का ऊडते मन हे माझे
    चेहऱ्यावरील हास्य तुझे पाहूनी।

संपले हे आयुष्य दिवसाचे
    येईल आता ती रात्र चालूनी,
प्रिये येशील का जीवनात माझ्या
    नव्या प्रेमाचा सुर्य घेऊनी।

...Jayjeet