नकारात्मक

Started by Tushar Sawant, October 25, 2016, 07:25:47 PM

Previous topic - Next topic

Tushar Sawant

नकारात्मक

काय असतो देह?
अस्तित्व जगणे,
की क्षण क्षण मरणे..

कोण असतो देव?
दगडाला मानणे,
की सत्य जाणणे..

कुठे असते चित्त?
मोहामागे धावणे,
की समजुती ने वागणे..

का होते प्रेम?
तिला पाहून हसणे,
की या जाळ्यात फसणे..

कधी वाटते एकटेपण?
सर्वांमधे असणे,
की एकटाच सर्वांमधे बसणे..

किती असते साथ?
आजही नसणे,
आणि उद्याही नसणे..

- तुषार