ढग

Started by शिवाजी सांगळे, October 25, 2016, 11:10:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ढग

ढगांकडे पहातांना
मन सुद्धा हवं होऊन
आपसूक तरंगू लागतं
त्यांच्या  सोबत,
वेगवेगळ्या रूपांमध्ये...
कधी कधी जाणवते
अंगाई गाणाऱ्या आईची कुस,
तर कधी असचं
उंच ढगांच्या पाठीवरून
डोळे मिटून पाहतांना
भीती वाटायची, पडण्याची नव्हे,
तर, हरवून जाण्याची भीती...
नाती सुद्धा अशीच असतात ना?
काही दाट, बरीचशी विरळ?
तरंगत येतात, लुप्त ही होतात,
कधी मिठीत सामावून घेतात,
काहीश्या अपनत्वाने,
परंतु कायमस्वरूपी नाही...
विखुरणे तर स्वभावच आहे... ढगांचा,
अवकाश तर बदलत नाही,
ढग मात्र विखुरतात...!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९