|| स्त्री जीवन ||

Started by k.suhas, October 26, 2016, 12:22:04 PM

Previous topic - Next topic

k.suhas

मी अशीच जगत आली
मुलगी म्हणून आई वडिलांचं
बायको म्हणून नवऱ्याचं
आई म्हणून मुलांचं
नेहमी मीच ऐकत आली
मी अशीच जगत आली

माझी इच्छा माझ्या अपेक्षा
माझी स्वप्न सारं काही
मी उशीखाली लपवत आली
मी अशीच जगत आली

कधी शिक्षणासाठी
कधी अधिकारांसाठी
जगात मोकळा श्वास घेण्यासाठी
या समाजासोबत सतत लढत आली
मी अशीच जगत आली

सकाळपासून रात्री पर्यंत
काही घरचं काही बाहेरच
बाराही महिने सतत
मी राब राब राबत आली
मी अशीच जगत आली

पिणारा नवरा , बेरोजगार पोरगा
गळत छप्पर या चार भिंतीमध्ये
सारं काही सावरत आली
मी अशीच जगत आली

घरच्यांच्या पोटभर खाण्यासाठी
कधी अर्धी भाकर खाऊन
कधी नुसता पाणी पिऊन
स्वतःचे पोट भरत आली
मी अशीच जगत आली

ज्याची म्हणून जगली तो सोडून गेला
ज्याच्यासाठी जगली तो विसरून गेला
इतकं सगळं दुःख लपवून
फक्त हसत आली
मी अशीच जगत आली

पण आता हे चित्र मला बदलायचं आहे
माझ्या लेकीला मनाप्रमाणे जागवायचं आहे
उच्च शिक्षण देऊन घडवायचं आहे
कल्पना चावला बनवून उडवायचं आहे
तिच्या मध्ये असं मला जगायचं आहे
तिच्या मध्ये असं मला जगायचं आहे

सुहास काकडे
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com