एक सांज.

Started by Dnyaneshwar Musale, October 26, 2016, 09:33:05 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तुझी वाट पाहुन पाहुन
डोळेही मिटले
येणार तु म्हणुन
आज जणु चंद्र तारे ही
निद्रेतुन लवकरच उठले.

वेळ असते भेटण्याची
तुझी कधी दुपार कधी सकाळ
अस्वस्थ मी पाहत असते,
दिवसभर प्रेम करून
मोकळं झालेलं सायंकाळच आभाळ.

माझी नाही कुठली खंत
नाही कुठली तक्रार तुझ्यापाशी
मावळतीचा सुर्य घेऊन
विखुरलेली पाखरे एकटीच जातात घरापाशी.
माझ्या सारख्याचं त्यांच्याही
मिळत्या जुळत्या नसतील राशी.

आता मोक्काट असणारा
वाराही मला फसवतो
उरला सुरला राहिलेला
एखादा प्रकाशाचा किरण
घेऊन स्वतःलाही लपवतो.

अनं पुन्हा त्या चांदण्या
येतात,
पुन्हा एका स्वप्नात
घेऊन जातात.