कविता II मला "मी" हळुवार आवडू लागलो II

Started by siddheshwar vilas patankar, October 27, 2016, 04:52:05 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


मला "मी" हळुवार आवडू लागलो

आत अजून काय दडलंय का ?

ते शोधू लागलो

सुखाचे तळे तुडुम्ब निपचित होते

दुःखाचे कारंजे उगा उडत होते

तुषार प्रहार यत्र तत्र देहावरी

काहिली चालली

शमे  ती धरता काळाने सावली

उगा लावूनी घोर , उचलतो डोंगर

सुंदर जीवन लोपले त्याच्याखाली

होऊनि अंतर्मुख शोधतो मी सत्य

सूर मारितो, त्या निपचित तळ्यात

तुषार हवेत असेच विरतात

जे पडतात खाली

ते तळ्यात मिसळतात


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C