सावल्या

Started by शिवाजी सांगळे, October 28, 2016, 05:26:14 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सावल्या

बरं वाटतं कधी
भूतकाळात डोकवायला,
एकटेपणात...
चांगल्या असो किंवा वाईट...
सावल्या त्याच्या.... घुटमळत राहतात
भोवताली ,
उत्साहित करतात
काही घटना, मोजके किस्से,
टोळक्याने ते शाळेत जाण,
एकत्रित शिक्षा भोगण...
पुन्हा भेटायच्या शपथा घेण,
पाणावल्या नेत्रांनी
दूरावणं...!
करिअर, घर आणि
जबाबदारीचं सावट
आता गर्द होऊ लागलयं
ओढत नेऊ लागलय
निरागसता...
तो अल्लडपणा,
जो हसतो कधी कधी...
एकटेपणात...

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९