कविता II कारण एकच होतं , दोघांचंही शेंबडं नाक होतं II

Started by siddheshwar vilas patankar, November 05, 2016, 01:12:11 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


ती मला आवडायची

आमची जोडी शाळेत मस्त जमायची

कारण एकच होतं

दोघांचंही शेंबडं नाक होतं II

कशी विसरेन शिशुवर्गातली

ती शेम्बडी भेट ?

लांबलचक शेम्बड्या पारंब्या दोघांच्याही

वरच्या ओठापर्यंत लटकलेल्या थेट II

शाळेतल्या पहिल्या दिवशी

ती बाबांबरोबर आली

मला घेऊन आईबरोबर आली

माझी लाडकी मामी

तिनं रडता रडता मला बघितलं

अन तिच्या शेम्बडानं

मला मस्तपैकी दिली एक शानदार सलामी II

तिथंच सारं सुरु झालं

शेम्बड़ नाटकं चालू झालं

तिच्या उजव्या नि माझ्या डाव्या नाकपुडीतून

मॅगीसारखा शेम्बूड लटकायचा

कधी हाताने झटकायचा

तर उरलेला मस्तपैकी गुपचूप चाटायचा II

दोघांची एकच सवय ती 

दोघे म्हणूनच एकमेकांना आवडती

बालपणीचे शिशु दोघे

बनविले पिवळ्या शेम्बडाने सोबती II

हळुवार शेम्बडाने घेतली

मोठ्या शाळेतून माघार

जाता जाता विणून गेला

घट्ट नात्याचा संसार II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C