मनाचा कोंडवाडा

Started by Dnyaneshwar Musale, November 05, 2016, 07:59:54 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

सांज भर  बागेत
तुझ्या सोबत फिरलं म्हणजे
मी तुझी प्रियसी का,
का मी नाही फिरू
शकत मैत्रीण म्हणुन.


एक फुल तु
चार चोंघात देताना
मी शांत होणं
मग मी प्रियसी  का,
का मैत्रीचं प्रतीक म्हणुन
मी नाही स्वीकारू शकत.

तु   माझ्या   आवडी
निवडींशी जाणता झाला
  म्हणजे प्रियसी  का,
का मी नाही सांगु
शकत मैत्रीण म्हणुन.

कधी चित्रपटगृहातली
मी एखादी नायक नायकाची
प्रेम कहाणी तुझ्या संगतीने पाहिली
तर प्रियसी  का,
का मैत्रीण म्हणुन
नाही पाहु शकत.

कधी मनात खरूज बनुन
रोज विळखा धरून बसलेली
एखादी गोष्ट तुझ्या पर्यंत पोहचवली
म्हणजे तु प्रियसी  समजायचं का,
का मित्र म्हणुन नाही बोलु शकत तुझ्याशी.

तुझ्या सोबत जाऊन
मनसोक्त कॉफी पिणे
म्हणजे मी लगेच
तुझी प्रियसी का,
का चुकीचं ठरेल काही
मैत्रीण म्हणुन तुझ्यासोबत
कॉफीचा आनंद घेतल्याने.

का तु नाही समजु
शकत  मैत्रीण मला
प्रियसी पेक्षा ही मैत्रीच
अतुट असतं नातं हे 
समजेल का कधी तुला.