माणसे

Started by विनायक आनिखिडी, November 06, 2016, 06:11:20 AM

Previous topic - Next topic
माणसे
माणसांच्या जंगलात माणसेच माणसे
अजून मानसाळली नाहीत अशी माणसे
ह्रदयास बोचके बोल बोलणारी माणसे
बोलुनी फक्त हृदय जिंकणारी काही माणसे
जिंकून उरी बसून रक्त शोषणारी माणसे

कसे म्हणू मी माणसास खरी खुरी हि माणसे
श्वापदा परी चीर हरणारी माणसे 
कसे अजून जगतात माणसात माणसे
किती तरी रोज मरत जगतात काही माणसे

अजून माणसे अशी मोजकीच माणसे
त्यातून अजून मोजके असतात देव माणसे
माणुसकीस मारुनी हसतात रोज माणसे
एकांतात जाउनी रडतात काही माणसे

घडा पापाचा भरुनी मस्त जगतात काही माणसे
पापास घाबरून सदा राहतात साधी माणसे
अशी कशी यंत्रा परी राहतात काही माणसे
संवेदना हरून वृक्ष झालीत फार माणसे

अमाप शौर्य करुनी जग जीकणारी माणसे
जगतात दिपास्थंभ असे असतात काही माणसे
नामा तुका नी ज्ञाना परी असतात देव माणसे
शिवबा नी लक्ष्मीबाई परी असतात शूर माणसे

आज कसे शोधू मी माणसांत माणसे
मलाच आधी शोधू द्या माझ्यात देव माणसे
कृत्रिम अशा जगतात रमतात आज माणसे
निसर्गात रमून त्यास जपतात काहीच माणसे


सक्खे चुलत नी रक्ताच्या नात्यात काही माणसे
संकटात येतात धाऊन परकीच सदा माणसे
सभ्यतेत जगावे जोडीत सदा माणसे
जोडून माणसे मरून जगतात सदा माणसे

माणसांच्या जंगलात माणसेच माणसे
कसे म्हणू मी माणसास खरी खुरी हि माणसे

                                                              विनायक आनिखिंडी,पुणे