मरणाष्टक

Started by शिवाजी सांगळे, November 07, 2016, 06:43:13 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मरणाष्टक

मरणारा मरून जातो
आपण का रडत बसतो?
पाळायचेच का दिवस?
वर्षश्राध्द का हो करतो?

मरून गेल्यावर कुणी 
मागे का हो कष्टी होतो?
जबाबदारी अंगी येईल
म्हणुन का टेंशन घेतो?

मरून गेल्यावर कुणी
मोकळा श्वास का घेतो?
जाचातुन झाली सुटका
म्हणता स्वच्छंद जगतो?

मरून गेल्यावर कुणी
मागे कोण काय करतो?
स्वत: फसत, फसवता
मन मर्जीने मुक्त राहतो !

मरून गेल्यावर कुणी
नक्की काय विचार येतो?
झालेला खर्च वाया गेला
त्याचा पण हिशोब होतो !

मरून गेल्यावर कुणी
काय विचार मागे उरतो?
कसा गेला आपल्यातुन
हा विचार काेण करतो?

मरून गेल्यावर कुणी
मागे काय ठेवुन जातो?
कुणाच्या दिल्या घेतल्या
ॠणातुन मोकळा होतो !

मरून गेल्यावर कुणी
जगी कोण एकटा पडतो?
आयुष्य तेवढचं स्वतःचं
मरण येईस्तोवर जगतो !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९