सच्चा अभिनेता माझे वडील

Started by ashrita vijay barse, November 11, 2016, 09:33:03 PM

Previous topic - Next topic

ashrita vijay barse

"आज जर या जगात असता तर, कदाचित दिवस वेगळे असते... तुमची ईच्छा पूर्ण झाली असती... अलिबाग मध्ये नवीन चित्रपट व्हावा हि तुमची इच्छा होती... तुमचं स्वप्न अपूर्ण राहील... याची खंत अजून ही आम्हाला आहे... ज्या दिवशी या जगातुन आम्हा सर्वांना व "प्रयास सांस्कृतिक मंडळ" या संस्थेला सोडून निघुन गेलात, तेव्हा लोक एकच वाक्य म्हणाले, "अलिबाग मधला हुशार व्यक्ती या जगातुन निघून गेला" तुमची राहिलेली सर्व स्वप्न अधुरी राहिली... एक प्रकारे तुमची अधुरी कहाणीच झाली... जी सर्वाना उमजून आली... तुमच्या सारखा उत्तम "लेखक", उत्तम "दिग्दर्शक", उत्तम "अभिनेता" आणि उत्तम "गुरु" कधी होऊच शकत नाही. विजय बारसे हि अशी व्यक्ती होती की जिने प्रत्येक माणसाला नाटकासाठी घडवलं... मेहनत घेतली... प्रत्येकामधला कलाकार बाहेर काढला... आणि रंगमंचावर पाऊल टाकण्यास भाग पाडलं... हि व्यक्ती अशी होती की ह्या व्यक्ती स्वतःच्या कुटुंबाला हि सांभाळ, तसेच स्वतःच ऑफिस च काम आणि नाटकासाठी तेवढाच वेळ दिला... फक्त अलिबाग मध्ये एक तरी चित्रपट व्हावा अशी तुमची इच्छा राहून गेली... आज जर या जगात असता तर कदाचीत या अलिबाग मध्ये आज विजय बारसे जी चा चित्रपट झालाच असता... पण एकच सांगू इछिते कि तुमच्या सारखा धीट, हुशार आणि सर्व प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या, तसेच उत्तम लेखक, दिग्दर्शक, अभिनेता व उत्तम व्यक्ती असणाऱ्या स्व. विजय बारसे याना मनाचा मुजरा..."
कु. अश्रिता विजय बारसे...