खंत

Started by Rupesh Gade, November 11, 2016, 10:21:05 PM

Previous topic - Next topic

Rupesh Gade

आयुष्यभर माणसाने फक्त पैसा कमावला,
आणि लाखातल्या एक एक रुपयाने सुध्दा त्याला दमावला, कधी घरच्या, कधी मुलाचा तर कधी पुढच्या  पिढी चा विचार करायचा,
आणि भष्ट्राचाराने आपला आनावश्यक खिसा भरायचा, कधी जमिनीत, भिंतीत तर कधी पाण्यात हि पैसा पुरला, मेल्यावर मात्र फक्त मातीचा कण हातात उरला, ज्यांच्यासाठी पैसा कमावला, त्यांची ही स्मशान पर्यंत साथ होती, लागताच अग्नी देहाला...तुझ्या दिशेने फक्त  पाठ होती, रिकामी हाताने आला, रिकामी हाताने गेला, आणि संपत्ती कमावण्याच्या नादात तुझ्यातला मात्र माणूस मेला, जिवंत असताना सुख, ऐश्वर्य हेच तुझ्या भोवती होते, पण मृत्यू नंतर जळते निखारे हेच तुझे सोबती होते,
आता एक विनंती आहे, तुझ्या चुकीची खंत तुझ्या मनात असू दे, आणि देवाला नजर देताना, तुझ्या डोळ्यात थोडी भीती दिसू दे ।         
                                          - रुपेश मारुती गाडे.