विचार तर कराल

Started by Akshay Bansode, November 17, 2016, 10:10:42 PM

Previous topic - Next topic

Akshay Bansode

Demonetization..

तेच मुद्दे,वेगळी मांडणी.

शीर्षक-विचार तर कराल.

तेच प्रश्न,उत्तरे अनेक.
अनेक उत्तरं,अनेक शंका.

•प्रधानमंत्री मोदींवर विश्वास तर का ठेवायचा?
अविश्वास ठेवण्यासाठी काही मुद्दे आहेत का?
हो आहेत.
१.गुप्त आणि धडाकेबाज निर्णय असताना गुजरातच्या वर्तमानपत्रात सहा महिने अगोदर येणारी बातमी..
२.संघाशी संबधित वर्तमानपत्रात निर्णय जाहीर करण्याअगोदर येणारी बातमी..

•प्रधानमंत्री मोदी प्रामाणिक आहेत का?
हो आहेत..
१.पाचशे हजाराच्या नोटा रद्द केल्या म्हणून.
पण अप्रामाणिक कृत्य मोठे असेल तर प्रामाणिक कृत्यावर क्षणात पडदा पडू शकतो.

•प्रधानमंत्री मोदी अप्रामाणिक आहेत का?
हो आहेत..
१.२००० ची नोट दोन दिवसाअगोदरच एका भाजप संबधित माणसाकडे येणे.
     हे अप्रामाणिक कृत्य सरळपणे निशाना साधण्यास योग्य आहे,अगोदरच काही सेटिंग फिक्स झाली होती.

•प्रधानमंत्री मोदी बेजबाबदार आहेत का?
हो आहे.
१.रांगेत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.त्यासाठी काहीही उपाययोजना नाही.
२.२०००च्या नोटांचा जाणारा रंग..नोट पाण्यात भिजली की भल्याभल्यांचा तोंडाचा बदलणार रंग.
३.२००० च्या नोटेबद्दल पसरवल्या गेलेल्या अफवांना आणि अफवा पसरवणार्यांना रोखण्यास असक्षम किंवा पसरवण्यास वाव देणे.
उदा..Zee News

•ब्लँक मनीवर योग्य आणि महत्त्वपूर्ण निर्णय स्वीस बँकांवरती धाड घालणे हा असू शकतो,पण तसे काहीही केले गेले नाही..

अजून खूप काही आहे सांगण्यासारखे पण हे एवढे साधेसुधे तुम्ही पेलू शकाल काय?

सत्य हे मेंदूवर घणाघाती प्रहार करणारे असते.मजबूत प्रहार जरी झाला असला तरी असत्य मंजूर कराल तर स्वतःच्या मेंदूशी अप्रामाणिक व्हाल.

टीप-भावनिक होऊन विचार करणे सोडा,जे सत्य आहे ते स्वीकारण्याची तयारी ठेवा.मी कोणत्याही पार्टीचा समर्थक नाही.काही घटनांचा चौफेर विचार करणे हेच माझे ध्येय आहे.
चर्चेसाठी तयार आहोतच.

अक्षय...