*"तसा" पैसा बाळगणार्यांसाठी..*

Started by SagiGharage, November 19, 2016, 11:52:27 PM

Previous topic - Next topic

SagiGharage

*काय चाललंय हे नागरिक मित्रांनो...?*

*"तसा" पैसा बाळगणार्यांसाठी..*

मी... सागर घारगे... मजकरवी.. सविनय...

ज्या दिवसापासून हजार - पाचशेच्या नोटा बंद झाल्या त्या दिवसापासून आजपर्यत कित्येक लोकांनी जमलेला, थांबलेला पैसा बाहेर काढायला सुरुवात केली... त्याचप्रमाणे काही लोकांनी मात्र कोट्यवधी रुपयांची अक्षरश: राख रांगोळी केली.

रोज वृत्तपत्र तसेच वृत्त वाहीन्यांमधून इतके लाख- इतके कोटी रुपये कचर्यात, इतके पैसे जाळलेल्या अवस्थेत... अशा बातम्या बघायला मिळतायत...!!

मान्यय.. की हा पैसा प्रामाणिक मार्गानं मिळवलेला नाहीय... आणि त्यामुळं त्या पैशाची किंमत त्यांच्या दृष्टीनं कवडीमोलाची बनली असेल...
पण लक्षात घ्या मित्रांनो...
दि. ३० डिसेंबर, २०१६ रोजी पर्यत जुन्या नोटा या बदलून घेता येणार असल्यानं त्यांची किंमत आजही आणि ३० डिसेंबर रोजीपर्यन्त तितकीच असणार आहे...

तेव्हा तुम्ही जर असा पैसा बाळगून असाल आणि तो जमा ही करु शकत नसाल तर तो पैसा तुमच्या काहीच कामाचा नाही...पण,,,, काही लोकांसाठी तुमचा असा पैसा एकप्रकारे जीवामृत ठरु शकेल...

कोट्यावधी रुपयांची राख-रांगोळी करण्यापेक्षा त्या पैशाचा सदुपयोग करा...

*पण हे कसं करु शकाल??*

मित्रांनो,
तुम्हाला तुमचा जमवलेला (काळा म्हणत नाही!!) पैसा व्हाईट करुन देणार्या टोळ्या निर्माण होतायत.. पण लक्षात घ्या मित्रांनो... नोटा व्हाईट करणे केवळ अफवा आहेत..

पैसा व्हाईट करण्याच्या नादात... अशा लोकांकडे आपल्याजवळील पैसा सोपवू नका... गेले तर तुमचे ते नव्हतेच... पण त्या पैशाचा 30 डिसेंबरपर्यत तितकाच गैरवापरही केला जाऊ शकतो...
तेव्हा मित्रांनो...
*असा पैसा दान करा ... अमुल्य आत्मिक समाधान मिळवा...!*

▼समाजात असे काही घटक आहेत... ज्यांना तुमच्या पैशाची खरंच गरज आहे... (गरज याकरीता म्हणतोय काहींना गरज नसते मात्र लाभ हवा असतो... ) खरा गरजवंत ओळखा.. त्याला मदत करा...

▼ *अशी गरजू लोक तुम्हाला कुठे मिळतील?? *

☞ दुर्दम्य आजार असलेली लोकं.. इस्पितळं..

आपल्या गावात, शहरांत अनेक अशी इस्पितळं आहेत जिथे तुम्हाला आजारानं ग्रासलेली तर काही उपचाराच्या खर्चानं बेजार झालेली लोकं आढळतील.. तिथे तुम्हाला तुमच्या पैशाचं खरं मोल समजेल.. तिथे समजेल.. कि माणूस किती हतबल असतो जेव्हा रक्ताचा माणूस मृत्यूशी झुंज देत पडलेला असतो..पैशाची गरज असते ... पण जवळ पैसा नसतो... अशावेळी कित्येक कोटी रुपये जळत असताना त्यांच्या भावना काय झाल्या असतील???

मित्रांनो,

*अशा लोकांना असा पैसा दान करा.. गरजू ओळखा... मदत करा... आत्मिक समाधान मिळवा.!*

▼ कॅन्सरग्रस्त/रक्तक्षय
▼ हिमोफिलीया ग्रस्त / थायलेसिमियाग्रस्त मुले
▼ अतिखर्चिक शस्त्रक्रिया

👆 अशा गरजू लोकांची नावे नजिकच्या इस्पितळांमधून तुम्हाला सहज मिळू शकतील..

*पैसे देऊन नंतर नाव बाहेर आले तर??*

मित्रांनो... हा प्रश्नच मुळात चुकलाय.. कारण अशा व्यक्ती तुमचा पैसा आपल्या रुग्णासाठी वापरणार आहेत.. तुमच्या मदतीचं मोल तुमचं नाव जाहीर करुन ती कधीच फेडणार नाहीत... तरीही तुम्हांस भिती असेल तर नाव न सांगताही तुम्ही दान करु शकता....!!

*आणखी कुणासाठी??*

रोगग्रस्त, आजारग्रस्त पीडीत रुग्णांसोबतच तुम्ही इतर ठिकाणी देखील पैसा दान करु शकाल...

पण, *मित्रांनो, गरज ओळखा व तितकीच मदत करा..*

जितकी गरज आहे तितक्याच पैशाची मदत करा... ते ही जमल्यास शहानिशा करुनच... कारण जास्तीचे पैसे त्यांच्याही काहीच कामाचे असणार नाहीत...

नाव जाहीर करायचे नसलेस...गुप्तदान करा... पण पैशाची होळी करु नका... तो चलनी पैसा वापरात नसला तरीही आपल्या देशाची मालमत्ता आहे... तेव्हा त्याची होळी करुन देशाचं आर्थिक नुकसान करताय हे लक्षात असू द्या..

★आणखी कुणासाठी दान करु शकाल. ??

▼ लोकसेवेसाठी आयुष्य समर्पित करणार्या जवानांसाठी... पोलीस बांधवांसाठी.. त्यांच्या कुटुंबासाठी...

▼ धरणग्रस्त/दुष्काळग्रस्त/पुरग्रस्त शेतकरी-नागरीक

▼ गरीब व गरजू तरुणांना उद्योग-व्यवसायाकरीता, शिक्षणाकरीता..

▼ वृद्धाश्रम, अनाथ मुले, परित्यक्ता, बालगृहे, बालकाश्रम...

▼ सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था...

▼ आपण जिथे रहातो, त्या परीसरातील स्वच्छता तसेच इतर सामाजिक प्रश्ने मार्गी लावणे करीता...

*काही लोक असाही विचार करतील की रिस्क घेऊन पैसा असा वाटण्यापेक्षा राहू देत माझ्याच जवळ... झाले तर मलाच नुकसान होईल.. पण माझे नाव तरी बाहेर पडणार नाही..!*

अशा लोकांना प्रथम नमस्कार करुन खात्रीपुर्वक बोलू इच्छितो की,

ज्याप्रमाणे आपल्या कसबीचा वापर करुन असा पैसा मिळवण्यासाठी आतापर्यन्त आपण जी रिस्क घेतलीत..

त्यापुढे असा पैसा जाळून राख करण्यापेक्षा त्याचे दान करुन ते सत्कर्मी लावण्यात तुमचे तेच कसब आणखी चांगल्याप्रकारे तुमची मदत करु शकेल...!!

*काहीजण म्हणतात... मी लिहीतोय.. कारण माझ्याजवळ पैसा नाही...* पण मित्रांनो... पैशाचे मोल हे पैसा नसणारी व्यक्तीच जाणू शकते.. !! माझ्याजवळ जर असा पैसा असताच...तर कदाचित माझं ही प्रबोधन करायला अशाच एखाद्या मेसेज गरज पडली असती...!!😀

म्हणून, माझ्या भारतातल्या सुजाण नागरिक बंधूंनो,
देश बदलतोय... तो बदलेल... वा न बदलेल.... याचा विचार करण्यापेक्षा आपण आपली मानसिकता आधी बदलूयात... !!

*चला पैसा सत्कर्मी लावूयात..!*
*चला देशबांधणीची मुहुर्तमेढ रोवूयात..!*

(लिखाणांस चुक भूल माफी..!!)

- लेखन: *सागर घारगे,सांगली*
मोबाईल- 9960450648
©®
*लेखन: सागर घारगे*, सांगली
मोबाईल: 9960450648