कविता II जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही II

Started by siddheshwar vilas patankar, November 22, 2016, 03:48:42 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

नजरेतून पायउतार होणं

कधी जमलंच नाही

काय शोधत होतो अखेरपर्यंत

कधी कळलंच नाही

तो वेग मंदावला असाच

वारा बेभान वाहतच होता

धावता धावता कधी थांबलो

ते कळलंच नाही

खाली जमिनीवरून घेतला

वेध मी आकाशाचा

इच्छा धरिता मनात

तारा निखळून पडला

काय मागितलं होतं

अन काय पदरात पडलं

ते समजलंच नाही

सांगोपांगी कथा बहू ऐकल्या

काही ठेवल्या मनात

तर काही पोटात

जे घडलं प्रेमात माझ्या

ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही

माझं प्रेम माझ्याकडेच राहिलं

ते मला कधी फळलंच नाही


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

Vaishnavi Adkhale

खूप निर्णय घ्यायचे आहेत , पण चुकायची भिती वाटते ...

तुला डोळे भरून पहायचं आहे , पण तू नसण्याची भिती वाटते ..

आयुष्यात खूप फिरायचं आहे , पण हरवायची भिती वाटते ...

तुझ्या सोबत चालायचं आहे , पण तुझी साथ हरवायची भिती वाटते ...

तुझ्याशी खूप बोलायचं आहे , पण शब्द चुकायची भिती वाटते ...

तुझ्या खुप जवळ यायचं आहे , पण तू दूर जाण्याची भिती वाटते ...


siddheshwar vilas patankar

मला कळला नाही आपला अभिप्राय . नक्की कविता आपल्याला आवडली कि नाही .

सिद्धेश्वर विलास पाटणकर 
सिद्धेश्वर विलास पाटणकर C




siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C