पुणे न् उणे?

Started by शिवाजी सांगळे, November 24, 2016, 02:03:19 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पुणे न् उणे?

          पुण्यातील ट्राफिक हा भारत पाकिस्तान मुद्ध्या पेक्षा मोठा विषय आहे, चार दिवसापूर्वी पुण्यात प्रवास करण्याचा योग आला, फार मजेशीर प्रसंग अनुभवायला मिळाले. इथला एम.एच.१२ व १४ चा चालक त्याच्या आजु बाजूला असलेल्या अन्य कुठल्याही एम.एच. वाल्या चालकांना परग्रहावरील ऐलियन पाहिल्या सारखे आश्चर्याने का बघतो कुणास ठाऊक? कदाचित पुण्यात येऊन हे लोक एवढं शिस्तीत ड्रायव्हींग कसं करू शकतात हे कारण असु शकेल!

          दुसरं,  इकडचा दुचाकी स्वार नेहमी घोडयावर स्वार असल्यागत का वागत असतो? दिसला गॅप कि दामटा घोडं! अरे, रस्त्यावरील लोक बिचारे हात दाखवून थांब म्हणत असतात, तरी हे मात्र लढाईला निघाल्या प्रमाणे वागतात, तसा लढायांचा आणि पुण्याचा संबध जुनाच आहे म्हणा; वेळ कोणतीही असो, सिग्नलवरचा यु टर्न असो कि डिवायडरचा गॅप असो, हे नेहमी घाईत असल्या सारखे वागणार, प्रत्येकाला कुठे जायचं असत कुणास ठाऊक?

          तसं  पुणं म्हणजे एक संस्कृती, एक वारसा, एक परंपरा, एक विध्यानागरी, एक उद्योग नगरी, एक आय टी हब व आणखी बरचं काही, तरीही मागील काही वर्षा पासून पुण्याची लोकसंख्या जोमाने वाढली, महाराष्ट्रा व्यतिरिक्त साऱ्या देशभरातून नोकरी धंद्या निमित्त लोक इथे आले व इकडचेच झाले. पुर्वी पेन्शनरांचे म्हणुन ओळखले जाणारे पुणे आता चारही बाजूंनी बेफाम फोफावले गेले आहे. वाढत्या लोकसंख्ये नुसार चागल्या वाईट प्रवृत्ती, त्यातही वाईट प्रवृत्ती खूप वाढल्या, पर्यायाने गुन्हेगारीचा आलेख पण वाढता आहे. बाकी काहीही म्हणा आताशा पुण्याचं मराठीपण कमी जाणवलं, खैर म्हणतात ना...

पुणे तिथे काय उणे?
मुंबई प्रमाणे इथेही
लागले आहेत फुटू
परप्रांतीयांचे पान्हें !
         
          उगीच अन्य कुठल्या शहराशी तुलना वगैरे म्हणुन नाही केली, आलेला अनुभव शेअर करावा वाटला इतकचं.

= शिवाजी सांगळे, बदलापूर, जि. ठाणे +919422779941 +919545976589 email :sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९