ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 24, 2016, 04:51:40 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

*जातीचं सुदैव*

तो भास्कर ह्या धरेला प्रेमानं अंधारातुन काढतो
अरे प्रेमळ तो किती समतेन पशू पक्षात नादतो,!
*जवा त्यालाच,,,!*
*शिवसकाळ ! भीमसकाळ ! मल्हारसकाळ*
*सांगितलं जात ना,,,,,*
*तवा समजत प्रेमाचं दुर्दैव ,,,,,*
*अन् कळत जातीचं सुदैव,,!*

जवा माय नऊ महिने नऊ दिवस स्वप्नात रंगते
माणसाचा अंश म्हणून गर्भात संस्कार करते,!
*जवा गर्भ जगात येऊन स्वतःस ,,,,,,*
*मी मराठा ! मी ब्राम्हण ! मी महार,,*
*म्हणवून घेतो ना,,,,,*
*तवा समजत गर्भाशयाचं दुर्दैव ,,,,*
*अन् कळत जातीचं सुदैव,,!!*

ते संविधान समतेची बंधूभावनेची शिकवन देते
इथे माणसा माणसात माणूसकिला किंमत देते,!
*तरी इथला समाज,,,,*
*जाती ! धर्म ! पंथ ! पक्ष !*
*वाटला जातो ना,,,,*
*तवा समजत संविधानाचं दुर्दैव ,,,,,*
*अन् कळत जातीचं सुदैव,,!*

लोकशाही लोकांस अनमोन अधिकार देऊ केले,
पण इथला रोगी समाज मानसिक रोगी दृष्टीनेच
*जवा तो जात पाहून,,,,,*
*मतदान ! न्याय ! हक्क ! इज्जत ,,,,*
*देऊन जातो ना,,,,,,,*
*जवा समजत लोकशाहीचं दुर्दैव,,।*
*अन् कळत जातीचं सुदैव,!*

हाती समतेची मशाला तोंडी परिवर्तनाची भाषा
धार लावून लेखनीस रणांगणात उतरणारा कवी!
*जवा स्वतःस ,,,,,,*
*शिवकवी ! भीमकवी ! मल्हारकवी,,*
*म्हणवून घेतो ना,,,,*
*तवा समजत समतेचं दुर्दैव ,,,*
*अन कळत जातीचं सुदैव,,!!*

✍🏻 *ललित कुमार_______________*
*24/11/2016 (3:32pm)*
wapp7744881103
*आवडली तर जरूर शेयर करा फक्त बालिश बदल करू नये,,,,*