तू सोडून मला

Started by sagar dubhalkar, November 27, 2016, 10:13:35 AM

Previous topic - Next topic

sagar dubhalkar

तू सोडून मला जाऊ नको
तू अडून अशी पाहू नको
काय झाली चूक माझी
सांग मला , भिऊ नको

डोळे असून माझे
मी स्वप्न तुझेच पाहिले
तुझीच केली पूजा सदैव
हे आयुष्य तुलाच वाहिले
विनंती करतो हात जोडुनी
भाव माझा खाऊ नको
काय झाली चूक माझी
सांग मला, भिऊ नको

किती सांगावे कथन करुनि
दुःखाचा एक एक क्षण तुला
माणूस म्हणून समज जरा
काय वेदना होतात मला
अंतःकरणातून हाक मारली
थांब जरा जाऊ नको
काय झाली चूक माझी
सांग मला भिऊ नको

उदंड हे आयुष्य माझे
क्षणभंगुर ग तुझ्याविना
तूच नाही निवनात माझ्या
उपाय सुचेना मारण्याविना
दुःखाने सागर भरला
विरह गीत गाऊ नको
काय झाली चूक माझी
सांग मला भिऊ नको

कोन्याजन्माचं प्रायश्चित
अन कोण्या जन्माचं पाप हे
आज कोणाला जीव लावणं
खरंच गडे शाप आहे
भेटीला आला सागर तुझ्या
रागाने आग होऊ नको
काय झाली चूक माझी
सांग मला भिऊ नको

      sagar dubhalkar
         9604084846