नामशेष

Started by शिवाजी सांगळे, November 28, 2016, 10:10:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नामशेष

व्हावा कसा ध चा मा आता?
बाराखडी ती नामशेष झाली,
राईट हक्क वाटा सांगणार्‍या
जाणिवांची नवी भाषा आली !

राहिला ना आता तसा काका
ना आता तसा पुतण्या उरला,
प्रत्येकजण हल्ली सर्व गोष्टीत
आपलाही वाटा मागु लागला !

काय आणले कुणी येतांना?
सोबतीला काय नेणार आहे?
जगताना शब्द,जे दिलेे घेतले 
शेवटपर्यत तेच उरणार आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९