प्रकाश कन्या : हॆलन कॆलर

Started by Kumar Sanjay, December 01, 2016, 11:55:57 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

जगातील दुखी पीडित मानवी समाजचे दु:ख वेचून त्यांना ,अांनद , समाधान , मिळवून. देने यांसाठी काही माणसे सारखा संघर्ष करतात....अाणि अापले पूर्ण आयुष्य यांसाठी वेचतात अन्  अमर होवून जातात काळाच्या रेषेवर नेहमीसाठी
यांपैकी एक हेलन कॆलर होत्या
दिंव्याग बांधवांच्या प्रभागातील कर्णबधीरत्व आणि अंध या प्रभागात हेलेन केलेरचे नाव अतिशय अादराने घेतले जाते.
हेलन कॆलर यांचे  संपूर्ण नाव हॆलर अँडम्स कॆलर असे होतॆ . त्यांचा जन्म २७ जून १८८० मध्ये टस्किम्बिया , अमेरिका येथे झाला.
त्यांचे वडील सैन्यामध्यॆ अधिकारी होते. हॆलन कॆलर या जन्मतः अंध नव्हत्या. त्यांची दूष्टी अाणि श्रवणश्रमता चांगली होती.  हॆलर कॆलर यांना सन १८८२ ला brain fever. झाल्यानॆ मूकबधिरत्व आणि अंध अंपगत्व अालॆ. पण तरीही हॆलन कॆलरनॆ यां अंपगत्वासोबत संघर्ष करून स्वतः चा पथ तयार केला. यांत मोलाची  मदत मिळाली ती हॆलन कॆलर यांची शिक्षिका अँना सुलिव्हान यांची. पुढे विविध अध्ययन,  नियमीत अभ्यास, संवाद काैशल्य आणि अनुभव यांतून हॆलर कॆलर यांचा श्रमतांचा चांगलाच विकास होत गेला. यानंतर १८९६ शिक्षणसाठी शाळेत आंरभ केला. आणि १९०४ मध्ये पदवी संपादन केली. या विद्यार्थी जीवनात हॆलन कॆलरनॆ अनेक संवादाच्या पध्दती, लिपी, संभाषण, यांचा चांगला अभ्यास केला.आणि विविध गोष्टी अात्मसात केल्या. यानंतर आयुष्यभर त्यांनी अंपग बांधवांच्या हक्कासाठी काम केले. विविध देशात अनेक भाषणॆ दिली. बालमजुरी, अंपगत्व, जनसंख्या, अशा अनेक विषयाला त्यांनी हात घातला तसेच अंधाच्या समस्या या जगापुढं मांडल्या. हॆलन कॆलर एक लेखक म्हणून त्यांनी ' दि स्टोरी माय लाईफ ' तसेच विविध लेख , कविता, निंबध, लिहिले. हॆलन कॆलर बहुअायामी व्यक्तीत्व आणि तसंच त्यांच महान काम. आणि यांसाठी  त्यांना अमेरिकॆचॆ ' राष्ट्रपती पदक ' मिळालॆ. स्वतः अंपग असूनसुध्दा आपल्या अश्रमतॆवर विजय मिळवून जगाला दाखवून दिले मनात इच्छाशक्ती असेल तर असंभव जगात काहीच नाही.

कुमार संजय
7709826774