प्रकाशाचा महासूर्य : लुई ब्रॆल

Started by Kumar Sanjay, December 02, 2016, 10:53:23 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

जगातील अंधकार दूर करण्यासाठी भास्कर प्रकाशीत होतो अन् अंधकार नाहीसा होतो. तसाच मानवी अश्रमतॆचा अंधकार दुर करण्यासाठी एका मानवी  महासूर्याचा जन्म झाला.या मानवी भास्करानॆ प्रकाशाचॆ महाकाव्य लिहिले आणि मानवी वेदनाचा कंठ बनून आशेचा नवीन पथ उभा केला. आणि तोच पथ या मानवी मुक्तीचा अन् अंधकार दूर करण्याचा अाधार बनला. ही किमया साधणारा तेजाचा    महासूर्य म्हणजेच ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रॆल.
अाज अंधबांधवाच्या शिक्षणात वरदान ठरलेली  ब्रॆल लिपी शोधण्याचॆ महान काम या महान संशोधकानॆ केले. लुई ब्रॆल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ मध्ये फ्रांन्सच्या पॅरिस शहराच्या जवळील कुप्रे येथे झाला. पुढे १८१२ वयाच्या अवघ्या ३ वर्षाच्या असताना त्यांना अपघाती अंधत्व अालॆ.अाता हा बालक अंध झाला पण तरी खचून न जाता मोठ्या परिश्रमानॆ आणि  अापल्या इच्छा शक्तीनॆ व आई वडीलाच्या सबळ पाठिंब्याच्या जोरावर लुई ब्रॆल वयाच्या १२ वर्षात गणित, संगीत, इतिहास, लँटिन, इत्यादी विषयाचॆ अभ्यासक बनले. यांतुन या बालकाची प्रतिभा दिसून येते आणि त्यां सोबत परिश्रम करण्याची तयारी पण. पण अाता काळ हळूहळू पुढे-पुढे जात होता आणि त्यांसोबत हा प्रतिभावान बालक पण. यानंतर लुई ब्रॆल हे उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध झालॆ.आणि संशोधन करू लागले. यांच काळात बाबॅियार या संशोधकानॆ सैनिकांना अंधारात समजावी अशी एक स्पर्शलिपी तयार केलेली होती.आणि यांच लिपीची प्रॆरणा घेवून लुईनॆ अापल्या टिंबांच्या लिपीचे संशोधन सुरू केले.त्यांनतर आठ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर अंध बांधवांच्या अायुष्याला संजीवनी देणारी या महान ब्रॆल लिपीचा जन्म झाला.आणि अंध बांधवानी नवयुगात प्रवॆश कॆला.अाज अाधुनिक काळात या लिपीचे महत्त्व किती आहॆ हे यावरून कळते आज तरी अंध बांधवाचा शालेय विकास साधण्यासाठी ही एकमेव ब्रॆल लिपी आहॆ.अाज अंध बांधवाची पुस्तके,साहित्य ब्रॆलमध्यॆ तयार झाली  आहॆत .यामागे एकच प्रेरणा एकच नाव अाज पण कुणाच्या ब्रॆल शिकताना होंठावर असते लुई ब्रॆल.           

कुमार संजय...
   7709826774