कविता II कवाडाकडं बघत बघत जिंदगी निघाली II

Started by siddheshwar vilas patankar, December 02, 2016, 02:43:33 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


माझे अंदाज कधीच चुकत नाहीत

नेहमी अंतरलहरींचा शोध घेतो

त्यातूनच समोरच्या मनाचा बोध घेतो

कवाडातून खरं खोटं बाहेर येतं

कोण  किती पाण्यात आहे ते कळतं

हि उर्मी पूर्वीपण होती

पण तिची तेवढी गरजच नव्हती

पावलापावलावर सुखे हात जोडून उभी होती

जसा दिवस होता तशीच रात्रही होती

चंद्राने ऊन दिलं असतं तरी चाललं असतं

सूर्याकडून चांदणंपण कबुल केलं असतं

चरितार्थाची वाट धरिता कुंडलिनी जागृत झाली

काही पावलं खरी तर काही खोटी निघाली

आजवर केलेली जमापुंजी

बघता बघता बुडीत निघाली

कवाडाकडं बघत बघत जिंदगी निघाली


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C