स्वप्नाच्या हिंदोळणाऱ्या झुल्यावर....

Started by Rajesh khakre, December 02, 2016, 04:10:59 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

स्वप्नाच्या हिंदोळणाऱ्या झुल्यावर....

अगणित स्वप्नांचे गाठोडे घेऊन माणूस निघतो जगायला...
आणि दिवसागणिक एक एक स्वप्न लागते विरघळायला...
काही स्वप्न निसटतात, काही नजरेआड होतात, तर काही सोडतात जिव गुदमरुन...
विखरुन जाणारे स्वप्न बघून कासाविस होणारा जीव बळेबळेच आवरुन धरताना स्वप्नभंगाचे ओरखडे उमटत जातात मनावर...
मन साहवत जाते...
अश्रुंच्या धारात वाहवत जाते...मनात जपून ठेवलेले सर्व मनोरथ...
ओजंळीतून निसटणाऱ्या पाण्याप्रमाणे स्वप्न जातात अलगद निसटून...
मनात मात्र त्याचा ओलावा तसाच टिकून राहतो कितीतरी काळ...
मग मात्र मन धजावत नाही नवीन स्वप्न बघायला...
स्वप्नाच्या हिंदोळ्यावर झुलताना नाही वाटत कधी पाय घसरुन पडण्याची भीती...
आणि पडल्यावर पुन्हा नाही ठेवावा वाटत पाय स्वप्नाच्या हिंदोळणाऱ्या झुल्यावर....
©राजेश खाकरे
Mo.7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in