"आपलेच दात आपलेच ओठ"

Started by Rajesh khakre, December 02, 2016, 04:22:51 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

"आपलेच दात आपलेच ओठ"

दांडा कुऱ्हाडीचा तो गोतास काळ झाला
आपल्याच माणसाचा घात त्याने केला

केली सलगी त्याने परकीय माणसाची
अखंड संपविली मग जात लाकडाची

दुसरा कधीच नसतो खरा वैरी या जगात
आपलाच बेईमान जरी तो आपल्या घरात

स्वार्थाविना जगी या नाहीच काही मोठे
अहंकार त्यावर मग कसर ना राही कोठे

हि परंपरा मोठी, नाही ती आज-कालची
दोष कुणा द्यावा ही लढाई 'श्रेयत्वां' ची

आपल्याच पायावरी हा धोंडा आदळलेला
आपलेच रक्त वाहे परि समजे ना हे कुणाला
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com