मुलांचे जग

Started by sanjaykanha, December 02, 2016, 04:51:34 PM

Previous topic - Next topic

sanjaykanha

🌷🌹 *।। मुलांचे जग ।।* 🌹🌷

पाना फुलांचे जग हे आमुचे
निसर्गात आम्हा डोलू दया ।
चाचा नेहरूंची फुले आम्ही
वृक्ष-वेलींशी गोड बोलू दया ।।

प्राण्या पक्षांचे जग हे आमुचे
परिसरात आम्हा खेळू दया ।
कुत्रा मांजर चिमण्यांना पाहुन
गट्टीत त्यांच्यासंगे लोळू दया ।।

नक्षत्र गगन जग हे आमुचे
तारांगणात आम्हा जाऊ दया ।
शुक्र मंगळ शनी ग्रहांना
दुर्बिनेद्वारे वास्तवात पाहू दया ।।

मित्र सवंगडी जग हे आमुचे
त्यांच्याशी संवाद घालू दया ।
एकमेकां मदत करुनी
तिरस्काराची भावना टाळू दया ।।

आजी आजोबा जग हे आमुचे
राजाराणीच्या गोष्टीत रमू दया ।
लपा-छपी नि घोडाबैल
खेळ खेळून आम्हा दमू दया ।।

वही पुस्तके जग हे आमुचे
ज्ञान विज्ञानाने मोठे होऊ दया ।
स्वातंत्र्य विरांच्या यशोगाथाने
देशभक्ती प्रेमात न्हाऊ दया ।।

*स्वरचित*
कवी संजय कान्हव
मोबा 9850907498
धारगाव नाशिक

🌷🌹🙏👏🙏🌹🌷