संसार...(स्री जीवनावरील भाष्य)

Started by hrishi gaikwad, December 05, 2016, 12:55:42 AM

Previous topic - Next topic

hrishi gaikwad

संसार...

खेळ मांडलाय संसाराचा
आता संसारातच रमायचे
नवर्याच्या बोटावर
कठपूतली गत नाचायचे...

बाबांच्या परीला
आता जमिनीवर आणायचे
स्वतःच्या घरात जणू
मोलकरनीगत वावरायचे...

खेळ मांडलाय संसाराचा
आता संसारातच रमायचे...

अश्रुंच्या नदिवर आता
मुकेपनाचे बांध घालयचे
भावनांच्या झऱ्यालाही
संथ व्हायला लावायचे...

स्वतःच्या मनावर
आता आवर घालायचे
आत्म्याविणा फ़क्त
देह म्हणून जगायचे...

खेळ मांडलाय संसाराचा
आता संसारातच रमायचे...

दुःखी असतांना ही
आता दुःख मात्र विसरायचे
नवर्याच्या सुखात
स्वतःचे सुख माणायचे...

मुखवटयांच्या दुनियेत
आता प्रवेश साधायचे
जीवनातील नाटकांचे
एक एक अंक उजळवून काढायचे...

खेळ मांडलाय संसाराचा
आता संसारातच रमायचे...

माहेरच्या आठवणिंकडे
आता पाठ फिरवायची
एक गोड स्वप्न विरले
अशी मनाची समजूत घालायची...

उन्हाळलेल्या वाटेवर
पावले सरसावायची
ओसाड रानी
प्रितफुले उमलवायची...

खेळ मांडलाय संसाराचा
आता संसारातच रमायचे...

लेकरांच्या स्वप्नांना आता
स्वतःचे स्वप्न मानायचे
त्यांच्या भोवतीच् स्वतःचे
एक विश्व निर्माण करायचे...

स्वतःच्या तोंडचा घास
आता पिल्लांना भरवायचा
त्यांना काही कमी पडू नये
म्हणून पोटाला चिमटा काढायचा...

खेळ मांडलाय संसाराचा
आता संसारातच रमायचे...

पंख फूटता पाखरे
घरटे तर सोडायचेच
ते परतून येतील
ह्याच आशेवर जीवन सरवायचे...

आयुष्याच्या अगदी शेवटी
काही आकडेवारी आता करायची
जीवनाच्या गणितावर
बाकी शून्य लिहायची...

संसाराच्या गाड्याचे
जुंपण आता काढ़ायचे
खेळ संपला संसाराचा
आता मुक्तीच्या शोधात निघायचे..
-ऋषिकेश गायकवाड़
नाशिक,
9096979740











Kumar Sanjay

खुप छान सर ...स्री जीवनावरील भाष्य करताना वापरलेली शब्दांची शक्तीमत्ता अन् कथनशैली खुप बोलकी आहे

hrishi gaikwad


Ashok_rokade24

लेकरांच्या स्वप्नांना आता
स्वतःचे स्वप्न मानायचे
त्यांच्या भोवतीच् स्वतःचे
एक विश्व निर्माण करायचे...

छानच वाटले .

hrishi gaikwad