प्रश्न नेहमीचेच...

Started by गणेश म. तायडे, December 06, 2016, 10:57:45 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

प्रश्न नेहमीचेच पण
आज मनास रूतले
हृदय छेदुनी गेले
आज मनास छळले
कोण सोडवेल प्रश्न
अजुनही वाट आहे
दूरवरच्या डोंगरातूनी
उगवत्या सुर्याची आस आहे
आपलीच लोक आपल्या
स्वार्थात मग्न आहे
चांगुलपणाची जाती आता
स्वतःपुर्तीच मर्यादित आहे
अधर्माचा धर्म मात्र
सर्वत्र पसरत आहे
प्रश्न आणखी गुढ झालेत
विचार अकलनिय होऊ लागले
लपवून स्वतःचे चेहरे
मुखवटे सारेच चढवू लागले
कुणाच्या मागे टाकावी पाऊले
हात कुणाचा धरावा
शोध आहे आज स्वतःचा
धर्म स्वतःचा स्वतः शोधावा

- गणेश म. तायडे, खामगांव
  www.facebook.com/kavitasangrah11