अर्पुणी थेंब दोन ते...

Started by Anil S.Raut, December 06, 2016, 10:07:02 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

:::::::::::::: अर्पूणी थेंब दोन ते... :::::::::::::

घे सामावून तू अंतरी,माझ्या व्याकुळतेचा उसासा जरासा
छेडता तार दिलाची,नाद काळजात तुझ्या उमटू दे जरासा!

ये धावत...रक्ताळत तुझी पाऊले,असे मी म्हणणार नाही
अर्पूणी थेंब दोन ते आसवांचे आता,दे मज दिलासा जरासा!

बोलतो किती मी रोजच आत्म्याने आत्म्यासवे तुझ्या,मुकपणे
बोलता कर ना तू कधीतरी..हृदयी कोंडलेला शब्द जरासा!

उल्हसित होईन भ्रमरासम मीही ,असे कर ना तू काही
सांग भेटाया मज या हवेला,दे सोबती गंध मृग्मयी जरासा!

उगवतो रोजच सूर्य नवा अन् जुना होऊनि मावळतो
तो किनारा मिलना- दुराव्याचा,सांधतो आत्म्याचा प्रकाश जरासा!

      ✒ अनिल सा.राऊत
       📱 9890884228