तुझ्या त्या नरकातल्या यातना मी जिवंतपणीच भोगल्यात

Started by sanjay limbaji bansode, December 09, 2016, 02:37:06 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

भर चौकात नागडं करतय
नशीब नावाचा  वैरी

मेलेल्या ढोराप्रमाणे,
रोजच काढतय  सालपट
भूक नावाची सूरी

तोडतात लचके देहाचे चिकन तंदूरीगत
वासनाधीन कुत्री

स्वप्न तळल्या जातात भज्याप्रमाणे
वासनेच्या कढ़ाईत

तु काय भीती दाखवतो  रे सुकाळीच्या,
मला त्या नरकाची

तुझ्या त्या नरकातल्या यातना
मी जिवंतपणीच भोगल्यात

संजय बनसोडे 9819444028