कविता II आपल्या जगण्यात पण वेगळी स्टाईल हाय दादा II

Started by siddheshwar vilas patankar, December 09, 2016, 04:29:00 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


आपल्या जगण्यात पण वेगळी स्टाईल हाय दादा

आपण कधीच रडत कुडत नाय बाबा

अंगावर आलं कि सालं शिंगावर घेतो

भिरकावतो त्याला वर

असं ठोकतो असं फेकतो

कि डायरेक्ट लास्ट गियर

समजू नका असं कधी कि नेहेमीच जिंकत आलोय

अर्रे हजारदा मार खाऊन , तोंड सुजवून गेलोय

डोळ्यात नेहेमी अंगार माझ्या

नेहेमी वणवे पेटलेले

अश्रूंची तर बातच सोडा

ते तर जन्माला आलो तेव्हाच इस्पितळात विकलेले

मरणाला मी भीत नाही

अजून दुसरं कारण माहित नाही

एकाच मागणं देवा पुढे

च्यामारी आपल्या मरण्यात पण वेगळी स्टाईल पाहिजे

अंथरुणाला खिळून , मूग गिळून नाय तर ते

समाज कंटकांना पिळता पिळता पाहिजे

सलाम ठोकतील मलापण वरून माझे आजे  पंजे

सारे बोलतील एकमुखाने वाह राजे, वाह वाह राजे

आपल्या मरण्यात पण हि अश्शीच स्टाईल पाहिजे

सिद्धेश्वर विलास पाटणकर С
सिद्धेश्वर विलास पाटणकर C